पुरंदर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्य, जिल्हा, तालुका व इतर असे पूर्ण कार्यकारणी बरखास्त करून नव्याने बांधणीसाठी जाहीर केले होते.
त्याच प्रमाणे पुरंदर तालुक्यातही पक्षश्रेष्ठींनी निवडणूक प्रक्रिया साठी आदेश देऊन पुरंदर तालुका कार्यकारणी कार्यक्रम निश्चित केला ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पुणे जिल्हा सचिव आनंद रोकडे, पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड यांसह राजेंद्र ओव्हाळ उपस्थित होते.
यावेळी तालुका अध्यक्षपदी पंकज धिवार तर युवक अध्यक्षपदी स्वप्निल कांबळे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अन्वर शेख, तालुका सरचिटणीस श्रीधर सोनवणे, युवक कार्याध्यक्ष पदी नितीन केदारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळत सर्वानुमते क्रियाशील सदस्यांचे मतदान प्रक्रियेतून बिनविरोध निवड करण्यात आली.
पुरंदर तालुक्यातील प्रशासनावर असलेली पकड छाप तसेच गोरगरिबांवर होणारे अन्याय याची वाचा फोडण्यासाठी झालेली निवड ही सार्थ निवड असल्याबाबत तालुक्यातील युवकांमध्ये चर्चा होताना पाहायला मिळते व आनंद व्यक्त करताना दिसले.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी पंकज दिवार व स्वप्नील कांबळे यांना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी तसेच पुढील सामाजिक कार्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.