मुंबई
दलबदलूंना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार फटकारले आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. युती आणि आघाडीचं राजकारण करणार नाही, असं सांगतानाच आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत. आम्ही निर्लज्जांना शक्यतो शिवसेनेत घेत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते. आमच्याकडे निर्लज्ज येत नाही. निर्लज्जांना शक्यतो आम्ही घेत नाही. निर्लज्ज राजकारणी म्हणालो. एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं हे सध्या सुरू आहे. त्यामुळे मी हे म्हणत आहे. अनेक चांगले राजकारणी झाले. पण अलिकडे राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेलं आहे, असं राऊत म्हणाले.
आज एका तिकिटावर निवडून यायचं आणि लगेच निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात सत्तेसाठी उडी मारायची. हे कुठे तरी जनतेलाच थांबवावं लागेल. हे कशा पद्धतीने थांबवायचं याची योजना शिवसेनेकडे आहे. वारंवार पक्षांतर करणं किती काळ चालणार? असा सवाल त्यांनी केला.