आधी भाची मग 21 वर्षीय आत्यासोबत घडलं विपरीत; परप्रांतीयांच्या कृत्यानं सातारा हादरलं

आधी भाची मग 21 वर्षीय आत्यासोबत घडलं विपरीत; परप्रांतीयांच्या कृत्यानं सातारा हादरलं

सातारा

सातारा शहरानजीक वास्तव्याला असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह तिच्या 21 वर्षीय आत्यासोबत परप्रांतीय चार जणांनी धक्कादायक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सातारा शहरानजीक वास्तव्याला असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह तिच्या 21 वर्षीय आत्यासोबत परप्रांतीय चार जणांनी धक्कादायक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास दुकानातून दूध घेऊ घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला रोखून आरोपींनी तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जाब विचारण्यास गेलेल्या 21 वर्षीय तरुणीसोबतही आरोपींनी विकृत कृत्य केलं आहे. या प्रकरणी पीडित तरुणीनं सातारा पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

अमित भाटी, कांझी भाटी, पिता सोलंकी, शंकर सोलंकी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं असून चारही आरोपी राजस्थानातील रहिवासी आहेत. 1 सप्टेंबर रोजी (बुधवार) रात्री साडे आठच्या सुमारास एक अल्पवयीन पीडित मुलगी दुकानातून दूध घेऊन आपल्या घरी जात होती. दरम्यान आरोपी पिता सोलंकी आणि कांझी भाटी यांनी अल्पवयीन मुलीला अडवलं. दोघांनी तिच्या अंगाशी झोंबाझोबी करत तिच्याशी गैरप्रकार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *