करवा चौथच्या दिवशी गाझियाबादमधील एका व्यक्तीला शॉपिंग करणे चांगलेच महागात पडले. खरंतर, एक महाशय आपल्या बायकोऐवजी गर्लफ्रेंडसाठी शॉपिंग करत होता. योगायोगाने त्याची पत्नी देखील त्याच बाजारात खरेदीसाठी पोहोचली.
गर्लफ्रेंडसाठी शॉपिंग करताना तिने नवऱ्याला रंगेहात पकडले. त्यानंतर पत्नीने भर बाजारात पतीला बेदम चोप दिला. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.देशभरातील विवाहित महिला करवा चौथच्या तयारीत मग्न असताना गाझियाबादमध्ये भर बाजारात एका महिलेने आपल्या पतीला दिवसा तारे दाखवले आहे. पती पत्नीऐवजी गर्लफ्रेंडसोबत खरेदी करण्यासाठी गेला. अचानक त्याच बाजारात पत्नीही आपल्या मैत्रिणीसोबत खरेदीसाठी पोहोचली. त्यानंतर पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करताना रंगेहात पकडलं.
त्यानंतर रागाच्या भरात पत्नीने भर बाजारात पती आणि गर्लफ्रेंडला बेदम मारहाण केली.आता या घटनेचा सुमारे ४५ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर लोकांनी मीम्स आणि ट्विट करायला सुरुवात केली.
एका यूजरने लिहिले- आज ही रिस्क घेण्याची गरज होती का? तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘बहिणीला सोडू नकोस’, तर आणखी एका यूजरने लिहिले की, ‘हे करण्याची काय गरज होती.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गोंधळ शांत केला आणि सर्वांना पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये, असेही महिलेला समजावून सांगण्यात आले आहे. तसेच कथित प्रेयसीच्या कुटुंबीयांनाही पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.