आज पुण्यात रंगणार ऐश्वर्या व स्मृती बडदे यांचा लावणीचा थरार

आज पुण्यात रंगणार ऐश्वर्या व स्मृती बडदे यांचा लावणीचा थरार

पुणे

माधुरी तुकाराम बडदे निर्मित श्री. नाथभैरव प्रोडक्शन करते तुम्हा मुजरा, या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या कार्यक्रमाची आतुरता आता संपली असून तब्बल दीड वर्षानंतर’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दि.४ दुपारी १ वाजता करते तुम्हा मुजरा या कार्यक्रमाचा शो’ बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार असल्याची माहिती करते तुम्हा मुजरा कंपनीच्या डायरेक्टर माधुरी बडदे यांनी दिली.

या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ढोलकीच्या तालावर या लावणीने संपूर्ण महाराष्ट्रभर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं त्या कोडीत (ता .पुरंदर )येथील ऐश्वर्या बडदे व स्वप्नसुंदरी सीने तारिका स्मृती बडदे यांच्या अभिनयाने रसिक बेधुंद होणार आहेत, या कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, घरंदाज लावण्यांचे सर्व प्रकार पहावयास मिळणार आहेत.

ज्यामध्ये बैठकीची लावणी, पारंपारिक लावणी, छक्कड लावणी, शृंगारिक लावणी, विरह रसातली लावणी अशा विविध प्रकारच्या लावण्यांचा बहारदार शो रसिक प्रेक्षकांसाठी नाममात्र ५०० व ४०० रुपयांच्या शुल्कावर होणार आहे.

२०१६-२०१७ साली अकलूज येथे झालेल्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवामध्ये ऐश्वर्या बडदे व स्मृती बडदे यांना उत्कृष्ट अभिनया बद्दल प्रथम पारितोषिक मिळालं होतं, थोड्याच कालावधीत या दोघी बहिणींना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं, त्यानंतर कधीच या दोघींनी मागे वळून पाहिलं नाही.

आपल्या अभिनयाबद्दल दरवर्षी या दोघींना वेगवेगळे पुरस्कार भेटत गेले, आपल्या लावण्यांच्या नृत्यावर महाराष्ट्रासह देशभरात लावण्यांचा दबदबा निर्माण करत गेल्या, कोरोना नंतर पुण्यात प्रथमच करते तुम्हा मुजरा कार्यक्रम होत असल्याने ऐश्वर्या व स्मृति यांच्या लावण्यांनी पुणेकर मंत्रमुग्ध होतील यात शंकाच नाही.

या शोमध्ये साधारण ३० कलाकारांची टीम असून विशाल चव्हाण, सीमा पोटे, मॉडेल पूजा या उत्कृष्ट कलाकारांचा देखील समावेश असल्याने प्रेक्षकांनी ही संधी दवडू नये असेच आता बोलाव लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *