पुरंदर
पुरंदर तालुक्यातील आंबळे या गावातील सर्व विद्यार्थ्यांसाठी गावचे उपसरपंच सचीन दरेकर यांच्या प्रयत्नातुन सर्व म्हणजे दोनशे विद्यार्थ्यांना उद्या दप्तरांचे वाटप करण्यात येणार आहे.
मी फक्त नाममात्र आहे मला पद हे गावच्याच लोकांनी दिलेले असल्याने गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे माझे काम असुन विद्यार्थी हेच गावचे भवितव्य असल्याने त्यांना आवश्यक असणार्या सर्व गोष्टी ग्रामपंचायतच्या माध्यमातुन व सचीन दरेकर मित्र परिवाराच्या माध्यमातुन पुरविणार : सचीन दरेकर, उपसरपंच, आंबळे
आंबळे गावचे उद्योजक तसेच दानशुर व्यक्तिमत्व विठ्ठल गंगाराम जगताप व सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या माध्यमातुन गावातील पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात येणार आहे.