जालना
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केला. सर्वच स्तरातून याबाबत टीका झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे. राज्यभर अब्दुल सत्तार यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा तौर यांनी तर अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे.अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.
मात्र अब्दुल सत्तार यांचे जो कुणी कपडे फाडेल त्याला दहा लाख रुपये बक्षीस दिलं जाईल अशी घोषणाच रेखा महेश तौर यांनी केली आहे.