पुणे
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, यावर आता खुद्द शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे मात्र आमच्याकडे संख्याबळ नाही, संख्याबळ असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन काही तरी निर्णय घेतला असता’ असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.भाजपाने त्यांच्या पक्षात काय करावे हा त्यांचा प्रश्न, अनिल देशमुख १ वर्षे जेलमध्ये होते. संजय राऊत देखील जेलमध्ये होते. नवाब मलीक आजही जेल मध्ये, राज्य पातळीवर काम करणाऱ्या या नेत्यांना पाहता त्यांच्या भुमिकेचा विचार त्यांनी करावा, असंही पवार म्हणाले.मविआमध्ये कुठलाही वाद नाही, नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झाला.
आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतल नाही एवढीच व्यथा आहे पण आता तो विषय संपलामुंबई मनपाची निवडणूक पाहुन मोदी महाराष्ट्रात येत आहेत, काही हरकत नाही.
ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींवर खोचक टीकाही केली आहे.”मागच्या काळात भाजपा नेत्यांचे पुण्यात वाढलेले दौरे, अमित शहांना पोट निवडणुकीसाठी पुण्यात यावं लागतंय म्हणजे आमच्या कार्यकत्यांचे काम चांगले सुरु असल्याचे लक्षण आहे, असं शरद पवार म्हणाले.