अजित पवारच पुणे जिल्ह्याचे दादा!

अजित पवारच पुणे जिल्ह्याचे दादा!

पुणे

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दहापैकी आठ जागा महायुतीने जिंकल्या, तर महाविकास आघाडीला अवघी एक जागा मिळाली आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झालेला आहे. या दहापैकी पाच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी, असा सरळ सामना होता.

त्यामध्ये सर्व पाचही जागा अजित पवार यांच्या गटाने जिंकल्याने अजित पवारांनी आपणच पुणे जिल्ह्याचे दादा आहोत, हे दाखवून दिले आहे. शरद पवारांच्या पक्षाचा एकही उमेदवार त्यांच्या ‘होम ग्राउंड’वर विजय मिळवू शकला नाही.

शरद पवार यांच्याविरुद्ध थेट सामना नसलेल्या भोर मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार संग्राम थोपटे यांना पराभूत करून दादांचे शिलेदार शंकर मांडेकर हे विजय झाले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने जिल्ह्यात सहा ठिकाणी उमेदवार उभे केले होते.

परंतु, हे सहाही उमेदवार पराभूत झाले. आंबेगावमध्ये देवदत्त निकम, जुन्नरमध्ये सत्यशील शेरकर, बारामतीमध्ये युगेंद्र पवार, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये रमेश थोरात, शिरूरमध्ये अशोक पवार यांना पराभवाचा दणका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *