पुरंदर
पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी उद्योजक तानाजी जगताप यांची तर उपाध्यक्षपदी संभाजी कोकाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राजेवाडी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ग्रामसभेमध्ये सरपंच दत्तात्रय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करून काही विषय मार्गी लावण्यात आले यावेळी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते तानाजी जगताप यांचा सन्मान करण्यात आला.
राजेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन गावातील तंटे पोलीस ठाण्यात न जाता गावातच मिटऊन गावात जातीय सलोखा,शांतता ठेवणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष तानाजी जगताप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राजेवाडी चे माजी सरपंच रामदास जगताप,सदस्य राजेंद्र शिंदे,नंदाताई जगताप,उद्योजक माऊली जगताप,संतोष जगताप,कॉन्ट्रॅक्टर तुषार जगताप,बबन राऊत,हरिभाऊ जगताप,महेंद्र जगताप यांच्यासह ग्रामसेविका उज्वला काळभोर तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांनी केले तर आभार ग्रामसेविका उज्वला काळभोर यांनी मानले.

