पुणे
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील जेजुरी एस. टी स्टॅन्ड समोर जेजुरी सासवड रोडचे मध्यभागी असणारे रोड दुभाजका जवळ अपघातात एका ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२६ जुन रोजी पहाटेच्या सुमारास वैजनाथ बाबुराव जाधव यांचा चुलत भाउ विष्णु मारूतराव जाधव वय 31 वर्ष महागांव ता. पुर्णा जि. परभणी हा रस्ता ओलांडत असताना त्यास कोणत्या तरी अज्ञात वाहनांवरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने अविचाराने भरधाव वेगात, रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून त्याचे ताब्यातील वाहन चालवुन चुलत भाउ विष्णु यास जोरात धडक देवुन त्याचे डोक्यावरून अंगावरून वाहनाचे चाक जावुन त्यात तो किरकोळ व गंभीर दुखापती होवुन त्याचे मुत्युस कारणीभुत झाला आहे. म्हणुन वैजनाथ बाबुराव जाधव यांनी अज्ञात वाहनांवरील अज्ञात चालकांचे विरूध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. पिंगळे करीत आहेत.