पुणे
पुरंदर तालुक्यातील माळशिरस परिसरात कोयत्याने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून, मृत तरुण हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावचा असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे. या हत्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, तसेच या प्रकरणातील आरोपी कोण आहेत, याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.

