पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आला असून, सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या छत्तीस वर्षीय खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
तर तो सासवड पोलीस स्टेशन येथील जेजुरी नाक्यावरचा राहणारा आहे, मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका अवचरे यांच्यासोबत किरकोळ पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला होता.
या वादातून सनी ऊफॅ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आला, अशी प्राथमिक माहिती स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टम साठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.