Pune News!!!!!    दोन वेळा जिल्हा परिषद,चार वेळा कारखाना संचालक,गावच्या सरपंचपदाचे स्वप्न अधुरे;पण सासऱ्यांचे अधुरे स्वप्न सुनेकडुन पुर्ण,सुनबाई झाल्या “सरपंच”

Pune News!!!!! दोन वेळा जिल्हा परिषद,चार वेळा कारखाना संचालक,गावच्या सरपंचपदाचे स्वप्न अधुरे;पण सासऱ्यांचे अधुरे स्वप्न सुनेकडुन पुर्ण,सुनबाई झाल्या “सरपंच”

पुणे

पुणे-सोलापुर महामार्गावर सर्वात मोठ्या व व्यापारीदृष्ट्या संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ऋतुजा अजिंक्य कांचन यांची सोमवारी (ता.21) बिनविरोध निवड करण्यात आली.

दोन वेळेस आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य असल्याचा बहुमान, चार वेळेस यशवंत कारखान्यावर संचालक म्हणून नियुक्ती असलेल्या महादेवराव कांचन यांचे उरुळी कांचन ग्रामपंचायत सरपंच पदाचे स्वप्न अधुरे राहिले होते. हे अधुरे राहिलेले स्वप्न सून ऋतुजा अजिंक्य कांचन यांनी पूर्ण केले आहे.

सरपंच मयूर पोपट कांचन यांनी आपल्या ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने हि निवडणूक घेण्यात आली. उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी माधुरी बागवे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी ऋतुजा कांचन यांचा एकमेव अर्ज आल्याने सदरची निवड ही बिनविरोध करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे व तलाठी प्रियांका सुंदरडे यांनी निवडणुकीचे कामकाज पहिले.

दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. 21) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी ऋतुजा कांचन यांचा एकमेव अर्ज आला होता. एकमेव अर्ज आल्याने उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी बागवे यांनी ऋतुजा कांचन बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. घोषणा होताच अजिंक्य कांचन यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून फटाके फोडून आनंद साजरा केला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेवराव कांचन, बहुजन आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय दीक्षित, अलंकार कांचन, पुणे बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध भोसले, उपसरपंच स्वप्नीशा कांचन, मावळते सरपंच मयूर कांचन,माजी सरपंच दत्तात्रय कांचन, अमितबाबा कांचन, संतोष कांचन, राजेंद्र कांचन,भाऊसाहेब कांचन, ग्रामपंचायत सदस्य संचिता कांचन, शंकर बडेकर, सुनिल तांबे, भाऊसाहेब तुपे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *