पुणे
आमदार बाबाजी काळे यांचे गाव असलेल्या काळेचीवाडी – पाडळी, (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माधुरी जयसिंग शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार काळेंच्या मार्गदर्शनाखाली मावळते सरपंच वैभव सातकर यांनी नुकताच राजीनामा दिला होता.
रिक्त पदाच्या निवडीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा राजगुरुनगरचे मंडल अधिकारी गणेश रोकडे यांनी बुधवारी (दि १०) ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. त्यात अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत माधुरी शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना सूचक म्हणुन माजी सरपंच संपत बालघरे यांनी स्वाक्षरी केली होती.
बिनविरोध निवडीची घोषणा होताच, सौ शिंदे समर्थकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच माधुरी शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. आमदार काळे यांच्या पत्नी व माजी सरपंच वैशाली काळे, संपत बालघरे, वैभव सातकर, सुदाम सातपुते, शितल सातकर, मंदा ढोरे, उज्वला सातकर हे पदाधिकारी व गावातील आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

