पुणे
पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन शुक्रवारी रात्री आला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांकडून संपूर्ण रेल्वे स्टेशनची झडती घेण्यात आली. त्यामध्ये कुठल्याच प्रकारची संशयास्पद वस्तू त्या ठिकाणी आढळून आली नाही.
सध्या रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती सामान्य आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी रेल्वे स्टेशनला आलेल्या निनावी फोन संदर्भात तपास सुरू केला आहे. हा फोन कॉल मनमाड परिसरातून करण्यात आला होता अशी माहिती आहे. पुणे पोलिसांचा पथक संशयिताला ताब्यात घेण्यासाठी रवाना झालं आहे.