Big Breaking!!!!बारामतीचा वळू बैल ते रावण..; शरद पवारांवर बोलताना “या” आमदाराची जीभ घसरली

Big Breaking!!!!बारामतीचा वळू बैल ते रावण..; शरद पवारांवर बोलताना “या” आमदाराची जीभ घसरली

पुणे

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय वातावरण तापले असून कोकणातही राजकीय रणांगण तापले आहे. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे इच्छुक उमेदवार मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे.

किरण सामंत यांनी राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात गेले काही महिने जोरदार संपर्क अभियान सुरू केल असून विकासकामांची भूमिपूजन, वाडीवस्त्यांवर गाठीभेटी, पक्षप्रवेश आदी कार्यक्रम घेत अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत धूमधडाका लावला आहे.

पाचल बागवेवाडी येथील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला रविवारी राजापूर दौऱ्यावर सदाभाऊ खोत यांनी आवर्जून हजेरी लावत किरण सामंत यांना आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत देत महायुतीच्या कामाचं कौतुक केलं आहे.

साखर कारखानदारी कोणाच्या ताब्यात बारामतीचा वळू बैलाच्या ताब्यात असं नाव न घेता खोत म्हणाले. पुढे खोत म्हणाले, मी तर म्हणतो शरद पवार म्हणजे अलीबाबा, शरद पवार एवढा पापी या जगात कोणी नाही अशी भाषा वापरत सदाभाऊ खोत यांनी ही टीका केला आहे.

राजापूर तालुक्यात पाचल बागवेवाडी उत्कर्ष मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांच्या विद्यमाने आयोजित मंजूर रस्त्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांच्या फंडातून एक कोटी ऐशी लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

खोत पुढे म्हणाले की,शरद पवारांना मानावा लागेल. आकाश खाता येत नाही म्हणून त्यांनी शिल्लक ठेवल आहे. शरद पवार यांनी आकाशात सुद्धा राज्य केलं असतं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेल नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रात सध्या जो गोंधळ सुरू आहे तो देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी सुरू आहे असा घणाघाती आरोप केला आहे.

शरद पवार यांनी या राज्यातील डावी चळवळ संपवली, कम्युनिस्ट संपवला, वेगवेगळ्या संघटना संपवल्या. पवारांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संपवला पण या महाराष्ट्रातून शरद पवार यांना एकच माणूस संपवता येत नाहीये त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. म्हणून शरद पवार महाराष्ट्रात आग लावत सुटले आहेत अशी टीका खोतांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *