पुरंदर
तालुक्यातील दरोडे, मारामाऱ्या, चोऱ्या या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिक हे भयभीत झाले असून पुरंदर तालुक्यात चांगलीच एक प्रकारची खळबळ उडाली आहे. हॉटेल समोर पेविंग ब्लॉकचे काम सुरू असताना, हॉटेलमध्ये आलेल्या गाड्या या बाजूला लावण्यासाठी सांगितले, असता केवळ एवढ्याच कारणाने तब्बल सात ते आठ जणांनी हॉटेल मालकासहित कामगारांना सुद्धा लाकडी दांडके आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली.
त्यानंतर हॉटेलच्या काचा फोडून गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन त्या ठिकाणावरून फरार झाले. या घटनेत कैलास निवृत्ती वांढेकर राहणार भिवडी आणि अनिकेत रामदास कटके( वय 25) राहणार भिवरी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गणेश पवार आणि दत्ता शेलार राहणार भिवरी ता. पुरंदर यांच्यासह त्यांच्या इतर पाच साथीधारावर सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवरी येथील हॉटेल निसर्ग येथे गेल्या आठ दिवसापासून पेविंग ब्लॉकचे काम सुरू आहे. पेविंग ब्लॉग चे काम सुरू असताना, सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान आरोपी दुचाकीवरून हॉटेल समोर आले त्यावेळी कामगारांनी काम सुरू असून गाड्या बाजूला लावण्यासाठी विनंती केली असता कामगारांच्या कानाखाली मारून तुला माहिती नाही आम्ही कोण आहोत. अशी दमदाटी करून सर्वजण त्या ठिकाणावरून निघून गेले.
त्यानंतर अर्ध्या तासाने त्या ठिकाणी स्प्लेंडर या दूचाकीवरून लाकडी दांडके आणि धारदार कोयते घेऊन आरोपी आले. त्यांनी पेविंग ब्लॉकचे काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जखमी फिर्यादी अनिकेत रामदास कटके हे मध्यस्थी गेले असता आरोपी दत्ता शेलार यांनी लाकडी दांडकेनी डाव्या हातावर आणि डोक्यात जोरदार मारहाण केली. त्यावेळी मोठा रक्तस्राव झाला. ते जोरात ओरडले. त्यांचा आवाज ऐकून कैलास वांढेकर वाचविण्यास आले असता आरोपी गणेश पवार यांनी त्याला लोखंडी कोयत्याने मारहाण केली. काउंटर मधील 18,300 लांबवले.
शेजारील मार्बलच्या दुकानांमधील सत्यजित शेंडगे वाचवण्यास आले असता, आरोपींनी दांडक्यांनी तसेच सिमेंट ब्लॉकने पाठीत मारहाण केली. इतर आरोपींनी पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन आतील फ्रीजची काच तसेच समोरचे डेकोरेशन मधील वस्तूंची मोडतोड केली. त्यानंतर गणेश पवार व दत्ता शेलार यांनी हॉटेलचे काउंटरमध्ये व्यवसाय करून जमा झालेली 18,300 ची रक्कम घेऊन त्या ठिकाणावरून पलायन केले.
यादरम्यान सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पुढील तपास करीत आहेत.