Big Breaking!!!!! पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील ३०३ उमेदवारांपैकी तब्बल “इतक्या” उमेदवारांचे डिपॉझिट जप्त….

Big Breaking!!!!! पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील ३०३ उमेदवारांपैकी तब्बल “इतक्या” उमेदवारांचे डिपॉझिट जप्त….

पुणे

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात तब्बल ३०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील तब्बल २५९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. जिल्ह्यातील ४४ उमेदवारांची अनामत रक्कम वाचली आहे.

त्यात २१ नवनिर्वाचित आमदार व त्यांचे प्रतिस्पर्धी २१ उमेदवार व अन्य दोघांचीच अनामत रक्कम वाचविता आली आहे.उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एकषष्ठांश मते म्हणजेच १६.३३ टक्के किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास अनामत रक्कम जप्त केली जाते.

लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक असते. विधानसभेसाठी खुला प्रवर्गासाठी १० हजार तर आरक्षित वर्गासाठी पाच हजार रुपये इतकी अनामत रक्कम निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागते.

विधानसभा मतदारसंघनिहाय डिपॊझिट जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या – जुन्नर-8, आंबेगाव – 9, खेड-11, शिरुर- 9, दौंड-12, इंदापूर-22, बारामती – 21, पुरंदर-13, भोर-4,मावळ-4, चिंचवड-19, पिंपरी- 13, भोसरी-9, वडगाव शेरी-14, शिवाजीनगर-11, कोथरुड-10, खडकवासला -12, पर्वती -13, हडपसर-17, पुणे कॅण्टोन्मेंट-18, कसबा पेठ-10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *