पुणे
वयाच्या शताब्दीकडे वाटचाल करणारे शिवशाहीर, इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासुन ते निमोनिया आजाराने ग्रस्त होते.त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ते काही दिवसापासुन उपचार घेत होते.अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
१५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजुन ०७ मिनिटांनी रुग्णालयात निधन झाले.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थीव त्यांच्या निवासस्थानी पर्वती येथे ८:३० वाजेपर्यंत नेण्यात येणार आहे.सकाळी १०:३० वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
“महाराष्ट्र भाषण” ही पदवी त्यांना महाराष्ट्र सरकारने बहाल केली होती.बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते.त्यांच्या निधनाने एक इतिहास संशोधक गमावला असल्याची भावना जाणकारांनी व्यक्त केली आहे.