Big Breaking !!!! अखेर झेंडे साहेब यांना मिळणार “या” मोठ्या पक्षाचं तिकीट? पुरंदरमधे होणार मैत्रीपूर्ण लढत?

Big Breaking !!!! अखेर झेंडे साहेब यांना मिळणार “या” मोठ्या पक्षाचं तिकीट? पुरंदरमधे होणार मैत्रीपूर्ण लढत?

पुरंदर

महाविकास आघाडीतून विद्यमान आमदारांन टिकिट निश्चित झाले तरी महायुतीतून उमेदवार निश्चित होत नव्हता. माजी राज्यमंत्र्यांना उमेदवारी जाहीर झाली तरी महायूतीत सर्व आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कारण एनसीपी गटाचे एकही कार्यकर्ता अर्ज दाखल करताना हजर नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

त्यातच अजित पवारांचे विश्वासू पिडीसी बॅंकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी काल सोमवारी अर्ज दाखल केला. माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी ही काल मंगळवारी अर्ज दाखल करत मोठे शक्ती प्रदर्शन केले. झेंडे हे मोठ्या पक्षाचे टिकिट खेचून आणणारच या भुमिकेत आहेत. रात्री झालेल्या हलचालींवरून झेंडे एनसीपी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.

राज्यात कितेक ठिकाणी एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांना थांबवून मेरिट मध्ये आघाडीवर असलेल्या दुसऱ्या उमेदवारंना टिकीट दिल्याचे उदाहरणे समोर येतं आहेत. त्यामुळे झेंडे घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात दिसले तर आश्चर्य वाटायला नको. 

महायुतीतील भाजप व एनसीपीच्या बहुतांश कार्यकर्त्यांना शिवतारेंची उमेदवारी रुचली नाही. पण उघड भुमिका घेता येत नसली तरी मतदान कोणाला करायचे हे त्यांनी निश्चित केले आहे. ‘दगडा पेक्षा वीट मऊ’ या भुमिकेत एनसीपी गटाची भुमिका आहे. महायुतीतील माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी सभापती यांचे झेंडे साहेबांसोबतचे घनिष्ठ संबंध आहेत हे जगजाहीर आहे. पुर्वाश्रमी हे सगळे एकत्रच होते.

काहिंचे नाते गोते ही  झेंडे साहेबांसोबत आहे. साहेबांचा नातलगांचा मोठा गोतावळा संपूर्ण पुरंदर व हवेली तालुक्यात आहे. त्यामुळे ते मेरिट वर सर्वात पुढे आहेत. त्यामुळे महायुतीतून झेंडे यांचे टिकिट निश्चित असून आता त्यांना घड्याळ चिन्ह मिळण्याचे निश्चित झाल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. 


पुरंदरच्या विधानसभा निवडणुकीत मोठे ट्विस्ट होणार असल्याचा वर्तवला होता. सनदी अधिकारी संभाजी झेंडे मोठी राजकीय खेळी खेळत असल्याचेही सांगितले होते. आज मंगळवारी दुपारपर्यंत झेंडे यांना एनसीपी अजित पवार गटाची उमेदवारी जाहीर होऊ शकते असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *