Big Breaking!!!!आता कितीही विरोध केला तरी तुम्हीच काय,पण ब्रम्हदेव आले तरी विमानतळ प्रकल्पाचे काम थांबणार नाही

Big Breaking!!!!आता कितीही विरोध केला तरी तुम्हीच काय,पण ब्रम्हदेव आले तरी विमानतळ प्रकल्पाचे काम थांबणार नाही

पुणे

पुरंदरचा विमानतळ शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी शासनाने पूर्ण तयारी केली आहे. तुमचे आमदार प्रकल्पासाठी खूप आग्रही असून खासदार सुद्धा सकारात्मक आहेत.त्यामुळे थोड्याच दिवसात ड्रोनद्वारे सर्व्हे होईल. आणि लगेच भूसंपादनाची पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कितीही विरोध केला तरी तुम्हीच काय, पण ब्रम्हदेव आले तरी विमानतळ प्रकल्पाचे काम थांबणार नाही,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सध्या राज्य शासनाचे अधिवेशन सुरू असून पुरंदर मधील विमानतळ प्रकल्प बाबत शासन दररोज एक एक अध्यादेश पारित करीत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमित झाले असून प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शासन वेगवेगळ्या घोषणा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुक्यातील होळ या गावी भेट घेतली. यावेळी बोलताना बारामतीजवळ विमानतळ करण्याचा प्रयत्न केला.

मात्र काही लोक अजित पवार यांनी विमानतळ नेले म्हणून ओरड करीत होते. पुरंदरचे विमानतळ पुण्यापासून जवळ आहे. वाहतुकीच्या दृष्टीने सर्वांना सोयीचे आहे. त्यामुळे ते करावेच लागेल असे ही स्पष्ट केले.

यावेळी सोमेश्वरचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, माजी जि. प. सदस्य दत्तात्रय झुरंगे, पी एस मेमाणे, पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे, खानवडी सरपंच स्वप्नाली होले, वनपुरीचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर, भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुंभारकर, जितेंद्र मेमाणे, ज्ञानदेव कुंभारकर, शांताराम कुंभारकर, सतीश कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, यांच्यासह विमानतळ प्रकल्प बाधित वनपुरी, उदाचिवाडी, खानवडी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

काही लोक तुम्हाला आम्ही तुमच्या सोबत आहोत, काही तरी मार्ग काढू असे सांगून वेळ मारून तुमची समजूत काढतील पण अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला करतानाच मला खोटे बोलायला आवडत नाही असेही स्पष्ट केले.

दरम्यान आमदार विजय शिवतारे यांनी विमानतळ प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितले असून त्यांनीही अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या असल्याचे अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांना तुम्हीच निवडून दिले आहे, मी संभाजीराव झेंडे यांना उभे केले होते पण तुम्ही त्यांना मातीत गाडून टाकले. अशा शब्दात आपला रोषही व्यक्त केला.
आम्हाला अधिकारी कोणतीही माहिती देत नाहीत त्यामुळे आमच्यात भीतीचे वातावरण असून आम्हाला आश्वस्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असता मी तुम्हाला मोकळे आश्वासन देऊ शकत नाही.

काही लोक म्हणतील आपण विरोध करू, आंदोलन करू, पण तसे काही करू नका. कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये विशेष लक्ष घालून शासनाला तशा सूचना दिल्या आहेत. परंतु तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ देणार नाही एवढी काळजी घेतली जाईल.

दरम्यान आम्हाल कोणीही काही माहिती देत नाही असे सांगताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना फोन लावून तातडीने शेतकऱ्यांची बैठक घ्यावी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, आपण त्यांना काय देणार आहे याची सविस्तर माहिती द्यावी अशा सूचना केल्या. तसेच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणे शासनाला परवडणारे नाही. त्यामुळे शांततेच्या मार्गाने त्यांचे समाधान करावे असेही अजित पवार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना फोन करुन लगेच सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *