होळीच्या दिवशीच काळाचा घाला!     दोनशे फूट दरीत कोसळली कार;पुणे जिल्ह्यातील “या” गावातील दोघांचा मृत्यू,दोन गंभीर जखमी

होळीच्या दिवशीच काळाचा घाला! दोनशे फूट दरीत कोसळली कार;पुणे जिल्ह्यातील “या” गावातील दोघांचा मृत्यू,दोन गंभीर जखमी

पुणे

पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात कार दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघें गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण पुण्यातील लोणी काळभोर येथील रहिवासी आहेत.दोन दिवसांपूर्वी हे सर्वजण कोकणात फिरण्यासाठी गेले होते.

महाबळेश्वर पाचगणी वाईमार्गे पुण्याला जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने व घाट उताराचा अंदाज न झाल्याने कार खोल दरीत कोसळली.

यामध्ये वैभव काळभोर,सौरभ जालिंदर काळभोर अक्षय मस्कु काळभोर, बजरंग पर्वत काळभोर हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील दोघांचा मृत्यू झाला.जखमींना खोल दरीतून दोरखंडाच्या साह्याने बाहेर काढले.

अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहिली. त्यामुळे घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.होळीच्या दिवशी दुर्घटना घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि सिद्धनाथवाडी वाई येथील शिव सह्याद्री रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *