जेजुरी
पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडला प्रकार
सदर घटना व पोलिस स्टेशनकडुन मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे:
बंडगार्डन पोलीस ठाणे पुणे आयुक्तालय यांच्याकडून पोस्टाने झिरो झिरो खाली अज्ञात इसमाचे मयत कागदपत्र प्राप्त झाले सदर कागदपत्राची अवलोकन केले असता दिनांक 23/6/21 रोजी अज्ञात इसमाचा उपचारादरम्यान हेड इंजुरी ने मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले सदर अज्ञात इसम हा भुलेश्वर माळशिरस याठिकाणी हॉटेल शिव दरबार धाबा या ठिकाणी दारूच्या नशेत रस्त्याच्या कडेला पडलेला असताना हॉटेल मालक राजेंद्र बनकर व त्याच्या साथीदाराने ॲम्बुलन्स मध्ये घालून प्रथम यवत व नंतर ससून ला दाखल केले होते अशा रीतीने मयताच्या प्राथमिक चौकशी मध्ये मालक राजेंद्र बनकर याने सांगितले होते सदर मताच्या अनुषंगाने गावांमध्ये कुजबूज सुरू होती त्या अनुषंगाने पोलिसांना माहिती मिळाली की सदरचा हा प्रकार पडून झालेला नसून त्याठिकाणी त्याला मारहाण झालेली आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने त्याचा पोलिसांनी बारकाईने चार-पाच दिवस तपास केला
या मयताचा सखोल तपास करत असताना सदर अज्ञात इसमाला तो दारूच्या नशेत असताना त्याने हॉटेल मध्ये मालका समोर उलटी केली म्हणून मालक राजेंद्र विलास बनकर वय 24 व त्याचा दुसरा वेटर तुफान उर्फ मीर न्यूटन आली वय 32 वर्ष राहणार पश्चिम बंगाल यांनी त्याला चप्पल व काठीने मारले त्यामध्ये इंटरनल इंजुरी होऊन तो तसाच झोपला दुसऱ्या दिवशी तो उठला नाही म्हणून मालकांनी त्याला प्रथम यवत व नंतर ससून दाखल केली नंतर तो 23 जुन रोजी मयत झाला सदर प्रकार हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांना सुरुवातीला खोटी माहिती दिली की दारूच्या नशेने मध्ये तो पडलेला आहे असून या ठिकाणी त्याला राजेंद्र बनकर घेऊन गेल्यानंतर सुद्धा त्याने त्याला ओपीडी मध्ये तसाच जखमी अवस्थेत सोडून दिला व हे भांडे फुटेल म्हणून त्याला सोडून तसेच निघून आले होते परंतु त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये त्याला घेऊन गेलेल्या अंबुलन्स चा नंबर दिसून आला त्यावरून सदरचे मयत हे जेजुरी हद्दीतील घडलेले आहे असे बंडगार्डन पोलिसांनी लेखी रिपोर्ट पाठवले आणि पुढे हा संशयास्पद प्रकाराचा धागा पकडून जेजुरी पोलिसांनी गोपनीय माहिती काढून व विश्वासनीय रीतीने चौकशी करून या खुनाच्या गुन्ह्याची उकल केलेली आहे यामध्ये वरील दोघांनाही अटक करण्यात आली आहे सदर मैताचा अद्यापही नातेवाईकांचा शोध लागलेला नाही कारण सदरचा वेटर हा पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणावरून राजेंद्र बनकर यांनी दोन दिवसापूर्वी कामासाठी आणलेला होता तरी त्याचाही फोटो सोबत पाठवत आहोत त्याची ओळख पटावी यासाठी आपण प्रसिद्धी द्यावी सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक माननीय मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक हे करत आहेत सदर गुन्ह्याची उकल पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर माळशिरस बीडचे बीट अंमलदार विपन्ना मुत्तांनवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कुतवळ पोलीस नाईक अक्षय यादव पोलीस शिपाई संदीप पवार पोलीस शिपाई शेंडे पोलीस शिपाई महाडिक पोलीस शिपाई खांडे पोलीस नाईक गणेश कुतवळ यांनी केली.