पुणे
शिवसेना संपवायला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जबाबदार आहेत. सगळा दोष पवार साहेबांचा आहे. स्वतःचा फायदा करून घ्यायचा. शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय पवार साहेबांना अपेक्षित होता. म्हणूनच त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते, जो निर्णय येईल त्याचं स्वागत केलं पाहिजे. हे मोठे लोक कुठे काही गेम करतील सांगता येत नाही, असंही शिवतारे यांनी म्हटलं.
शिवसेना संपवायला जबाबदार शरद पवार आहेत, सगळा दोष पवार साहेबांचा आहे. 2014 ला शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. तो कट होता. पवार साहेबांना शिवसेना-भाजपचा संसार चालू द्यायचा नव्हता. शरद पवारांनी कधीच शिवसेनेशी मिळवून घेतलं नाही.
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पवारांचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी राजकीय मतभेद होतेच, असंही शिवतारे यांनी म्हटलं.2019 ला एका खुर्चीच्या मोहापाय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाऊन बसले. मात्र शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले अशी टीका शिवतारेंनी केली पुढे ते म्हणाले की, 2019 ला एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत लाव रे तो व्हीडीओ म्हणायला लावला आणि गरज संपली की त्यांना झटकून टाकले. उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतला. शरद पवार यांचा डाव काल यशस्वी झाला.