अकोला
कीर्तनकार इंदुरीकर महाराज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील जनतेचा इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. इंदुरीकर महाराज त्यांच्या भाषा कौशल्यामुळे आणि विनोदी कीर्तनाने भाविकांना भोवळ पडत असतात.
इंदुरीकर महाराज यांची कीर्तने तुम्हाला अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पाहायला मिळत असतील. तसेच त्यांचे कॉमेडी व्हिडीओ ही सोशल मीडिया वर व्हायरल होत असतात.
यूट्यूब वर तुम्ही इंदुरीकर महाराज असे जरी नाव टाकले तरी त्यांच्या कीर्तनाची भली मोठी लिस्टच तुम्हाला पाहायला मिळेल. याच युट्युब वर इंदुरीकर महाराज चांगलेच संतापलेले दिसत आहेत.
इंदुरीकर महाराज म्हणाले, माझ्या जीवावर ४ हजार जणांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आहेत, आणि याच लोकांनी मला अडचणीत आणले.
यांचे वाटोळंच होणार, यांचे चांगले होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचे असे पोरगं जन्माला येईल असे हातवारे करत दिव्यांग या शब्दाकडे इंदुरीकर महाराजांचा रोख होता.