मुंबई
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल सावंतवाडीत कार्यकर्ता मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली.
शिवसेना आमदार दीपक केसरकर यांची शेंबडे आमदार म्हणून अवहेलना केली होती सावंतवाडीचा आमदार शेंड्या आहे.
शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. राणेंच्या सिंहासनाला मी हादरे दिले म्हणून त्यांच्या मनात सल आहे.
त्यामुळेच ते माझ्यावर ऊठसूठ टीका करत असतात, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे ते सावंतवाडीत येऊन माझ्यावर टीका करतात.
माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांच राजकारण चालतच नाही. राणे हे नुसतं बोलत असतात. ते कामं करत नाहीत. मी बोलून दाखवत नाही आणि ज्यावेळेला बोलतो तेव्हा काय होत हे तुम्हाला माहीत आहे.
तुमचं सिंहासन हललं कोणामुळे हे तुम्हाला माहीत आहे. आणि त्याचीच सल तुमच्या मनात आहे हे मला माहीत आहे, असा टोला केसरकर यांनी लगावला.