हृदयद्रावक !!!!!      शेवटचे मामाच्या घरी गेले ते परतलेच नाहीत; दोन आणि तीन वर्षीय चिमुरड्यांना टँकरने चिरडलं

हृदयद्रावक !!!!! शेवटचे मामाच्या घरी गेले ते परतलेच नाहीत; दोन आणि तीन वर्षीय चिमुरड्यांना टँकरने चिरडलं

मुंबई

चेंबूर पोलीस ठाण्याजवळ मंगळवारी सकाळी भरधाव टँकरने तिघांना धडक दिल्याने दोन वर्षांची मुलगी आणि तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात या अपघातातील मुलीची आई गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रुती गुप्ता वय वर्ष २ आणि ऋषी वय वर्ष ३ अशी दोन मयत चिमुरड्या मुलांची नावं आहेत. श्रुती गुप्ता ही कल्याण येथे राहणारी असून आई रंजना गुप्ता वय वर्ष २८ हिच्यासोबत ती मामांच्या घरी आली होती. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास चेंबुर नाका परिसरात असलेल्या एका रुग्णालयात आईसह ही चिमुरडी गेली होती.

रुग्णालयातून हे तिघेही घरी परतत असताना, चेंबूरच्या चरई तलावाजवळ रस्ता पार करत असताना चेंबूर कॉलनीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वेगात आलेल्या या टँकरने रस्ता पार करणाऱ्या तिघांना जोरदार धडक दिली.

यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते. तत्काळ तिघांना शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच श्रुती आणि ऋषीचा मृत्यू झाला. तर यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी टँकर चालक राजेंद्र गोहिल वय वर्ष ४६ याच्यावर गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *