सातारा
गेल्या अनेक वर्षापासून फलटन शहराचा कोणताही विकास झालेला नाही. रस्ते गटाराची समस्या अजूनही तशीच आहे. यामुळे आता फलटणमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. एखादा बैल औताला बसला तर त्याला बाजार दाखवतात.
रामराजे (हा बैल) 25 वर्ष हुन अधिक आहेत. त्यांना बदलण्याची गरज आहे असे आवाहन करीत आमदार जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान सेवा पंधरवडा सुरू असून यादरम्यान फलटण येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.
गोरे म्हणाले माण खटावात चाळीस वर्षे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सदाशिव तात्या पोळ यांची अबाधित सत्ता होती. त्या भागात रस्त्याचा प्रश्न होता. डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागायचे. सणासुदीला देखील ऊस आणायचा असेल तर फलटणमध्ये यावे लागायचे अशी अवस्था होती. माण खटावात मी आमदार झाल्यापासून आता हे चित्र बदलले आहे
आज माण खटावात 120 गावात पाणी आलंय. या भागात ऊस मिळत नव्हता त्या ठिकाणी चार साखर कारखाने उभे आहेत आणि आता पाचवा उभा राहतोय. एखादा बैल औताला बसला तर त्याला बाजार दाखवतात. रामराजे हा बैल 25 वर्ष हुन अधिक आहेत. त्यांना बदलण्याची गरज आहे. रामराजेंच्या घरातच सर्व पदे आहेत.
त्यांना जर एसटी एनटीचा दाखला मिळाला असता तर आमदार दीपक चव्हाण यांचे देखील काही खरं नव्हतं. ही सर्व घराणेशाही आहे. ही बदलायला हवी.
काँग्रेस पक्षात देखील पंडित नेहरू यांची कन्या इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी अशी घराणेशाही आहे.
बारामतीच्या पवार घराण्याची ही तीच अवस्था शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार पार्थ पवार या सर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत.भाजप पक्षात असं नाही सर्व सामान्य माणसाला संधी या ठिकाणी मिळते.
जर बारामतीच्या पवारांची आणि रामराजेंची बेनामी संपत्ती एकत्र केली तर महाराष्ट्राचे कर्ज संपून जाईल.फलटण नगरपालिकेवर या पुढील काळात भाजपचा झेंडा फडकणार. याबरोबरच येणारी पंचायत समिती तसेच सातारा जिल्हा परिषदेवर देखील भाजपचाच झेंडा फडकणार असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.