हा अजितदादा अन् माझ्यावरील अन्याय आहे: सुप्रिया सुळे

हा अजितदादा अन् माझ्यावरील अन्याय आहे: सुप्रिया सुळे

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्यानंतर पुढील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत हे तिन्ही नेते असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असं असतानाच, सुप्रिया सुळेंनी या चर्चेलाच पूर्णविराम दिला आहे.अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्यांनी या चर्चेलाच पूर्णविराम दिला.

दादाच्या आणि माझ्या फोटोवर कोणाचंही नाव नव्हतं. त्याच्यामुळं हा दादा आणि माझ्यावर अन्याय आहे. म्हणून यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करायला हवी, असं सुप्रिया सुळे बारामतीत म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘फोटो कोणी लावला आहे आणि कुठे लावला आहे? पुरावा असला पाहिजे. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा कुणालाही अधिकार नाही. जर कोणी हा फोटो लावला असेल आणि त्याच्यावर कोणाचं नाव नसेल, तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की मला न सांगता किंवा न विचारता तो कोणी लावला असेल तर, मुंबई पोलिसांनी मला न्याय मिळवून द्यावा.

हा फोटो कुठल्या पक्षाने लावला आहे का? कोणत्या व्यक्तीने लावला आहे का? असा फोटो कोणी लावू शकतो का? जर हा फोटो असा लावला असेल तर हा देश कायदे- नियमांनी चालतोय, असंही त्या म्हणाल्या.जयंतरावांचा फोटो कार्यकर्त्यांनी लावला होता. दादाचा आणि माझा फोटो असलेल्या बॅनरमध्ये साम्य आहे. कारण तो एका साइजचा आहे. त्याच्यावर कोणाचेही नाव नाही. त्याच्यामुळे हा दादा आणि माझ्यावर अन्याय आहे. यावर मुंबई पोलिसांनी ॲक्शन घेतली पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *