पुणे
मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याच्या धक्क्याने वडिलांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सावर्डे बुद्रुक (ता.कागल) येथे घडली आहे.तानाजी ज्ञानदेव पाटील (वय ४९) असे वडिलांचे नाव आहे.
मुलाचे रक्षाविसर्जन होण्यापूर्वीच वडिलांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तानाजी यांचा मुलगा रितेश याचा 15 मे रोजी गडहिंग्लजला परीक्षेला जाताना अपघातात मृत्यू झाला. ही घटना घडल्यापासूनच वडील तानाजी यांची तब्येत खालावली होती. शनिवारी सकाळी कागल येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.
दुसर्या दिवशी मुलाचे रक्षाविसर्जन होते. परंतु घरी आल्यानंतर चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तानाजी पाटील हे कोल्हापूर येथे खासगी नोकरी करत होते. त्यांच्या मागे आई, वडील, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.