पुणे
तेलंगणात पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अभिजीतच्या विजयामुळे हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं.तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना हरियाणाच्या सोनूवीर आणि महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेमध्ये रंगला. मात्र अभिजीतने आपला दबदबा कायम राखत हिंद केसरीवर आपलं नाव कोरलं.स्पर्धेमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. त्यामुळे विजय चौधरी स्पर्धेमधून बाहेर पडला आहे.
अभिजीत कटकेने 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे.