स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे माध्यमातून पुरंदर तालुक्यांत होणार दिड हजार किटचे वितरण…!!!!!

स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे माध्यमातून पुरंदर तालुक्यांत होणार दिड हजार किटचे वितरण…!!!!!

पुरंदर

सासवड सह पुरंदरच्या ग्रामीण भागात सातत्याने सामजिक काम करणाऱ्या स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे वतीने तालुक्यांतील अंगणवाडी सेविका ,मदतनीस, आशा वर्कर, सासवड आणि जेजुरी नगरपालिकेतील कामगार अशा सुमारे दिड हजारांहून अधिक जणांना कीटचे आणिब्लँकेटचे मोफत वितरण करण्यात येणार असून त्यांपैकी पहिल्या टप्प्यातील सुमारे सातशे किटचे वाटप सासवड येथे नुकतेच पार पडले.

सासवड येथील लांडगे आळीतील समाज मंदिरात सासवड, चांबळी, परिंचे या भागांतील अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर सासवड पालिकेतील कर्मचारी यांना किराणा स्वरूपातील विविध वस्तूंच्या स्वरूपातील किट वाटप करण्यात आले.

अक्षय पात्रा फाऊंडेशन आणि रॉबिनहुड आर्मी या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात असल्याने स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी सांगितले. उर्वरीत किट वाटप जेजुरी येथे रविवारी करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

सासवड येथील किट वाटप कार्यक्रमाच्या निमीत्ताने प्रतिष्ठानने ससून रुग्णालय रक्त पेढीच्या सहयोगातून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे सत्तावीस महिलांनी रक्तदानाचा हक्क बजावला. किट वाटप प्रसंगी धनंजय जगताप, भानुकाका जगताप, सनी जगताप, जनार्दन गवळी, नितीन पवार, पालिका आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, नितीन जगताप यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *