जळगाव
मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘ स्त्रीरोग तज्ज्ञ हे कधीच हातपाय बघत नाही.
हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील एका कार्यक्रमांमध्ये केलेले आहे.मंत्री गुलाबराव पाटील हे जळगावमध्ये एका कार्यक्रमात लोकांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी स्त्री रोगतज्ज्ञांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मंत्री गुलाबराव म्हणाले की, ‘लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर ओपीडी सुरू असते. माझी एक हजार जणांची ओपीडी होती. आठ ते दहा दोन तासांत काढतो. मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे.
स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही. आम्ही जनरल फिजिशियन आहे’,आमच्याकडे बायको नांदत नाही, तो पण माणूस येतो. डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र, आमचं एकटं डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. आम्ही ऐकणारे एकटे असतो.
त्यांच्या समस्या ऐकूण त्यांचे काम करतो. एक माणूस गेल्यानंतर आम्ही ऐवढे फ्रेश असतो, जसं की पहिलाच माणूस आला आहे’, असेही ते म्हणाले.दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ञांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातील स्त्रीरोग तज्ज्ञांकडून त्यांना काय प्रत्युत्तर दिलं जाईल, हे पाहावे लागणार आहे.