सिंगापुर येथे अक्षय उरसळ व सुमितनाना लवांडे मित्र परिवाराच्या वतीने लंपी रोगावरील प्रतिबंधात्मक मोफत तब्बल “इतके” लसीकरण  संपन्न

सिंगापुर येथे अक्षय उरसळ व सुमितनाना लवांडे मित्र परिवाराच्या वतीने लंपी रोगावरील प्रतिबंधात्मक मोफत तब्बल “इतके” लसीकरण संपन्न

पुरंदर

सिंगापूर गावात आमदार संजयजी जगताप व खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.ग्रामपंचायत सदस्य अक्षय उरसळ व सुमित नाना लवांडे मित्र परिवाराच्या वतीने लंपी रोगावरील प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत करण्यात आले.

लंपी रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जनावरांना या आजाराची बाधा होण्याआधीच काळजी म्हणुन हे लसीकरण करण्यात आल्याचे सिंगापुरचे मा.ग्रामपंचायत सदस्य अक्षय उरसळ यांनी सांगीतले.

सिंगापुर गावातील पुर्णपणे म्हणजे जवळपास दोनशे ते अडीजशे जनावरांसाठी अक्षय उरसळ व सुमित लवांडे यांनी मोफत लस उपलब्ध करुन दिल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

या लसीकरणासाठी डॉक्टर ताकवले,डॉक्टर कुंजीर तसेच डॉक्टर आण्णासो दरेकर यांचे मोलाचे सहकार्य झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *