गोंदिया
आजपर्यंत घरात सासू– सुनेत वर्चस्वाची लढाई नेहमी पाहिली आहे. मात्र गावाची कारभारींन बनण्यासाठी सासु- सुनेची थेट लढत पहिल्यांदा गोंदियात पहायला मिळत असून बोदरा देऊळगाव ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये हा प्रकार पहायला मिळत आहे. मोरगांव अर्जुनी तालुक्यातील बोदरा देऊळगाव ग्रामपंचायतीत ही सरळ लढत आहे.
येत्या 18 डिसेंबरला 1 हजार 650 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या 10 सदस्यीय (9+1) गट ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे. पंधरा वर्षानंतर या ग्रामपंचायतीला अनुसूचित जाती महिला सरपंच पद राखीव झाले आहे. येथे सरपंच पदासाठी सासु- सुनेमध्ये थेट लढत होणार आहे. आता गावात प्रभावी महिला शोधून सरपंच पदासाठी उभे करणार म्हणून देऊळगाव येथील मंदा योगिराज ढवळे (सासुबाई) यांना गावातील स्थानिक नेत्यानी सर्व धर्म समभाव पॅनलतर्फे सरपंच पदासाठी निवडणुकीत उभे केले.
आता निश्चीत केलेली महिला सरपंच होणार; असे गावकरी मानत असतांना आपणही प्रभावी महिला आहोत असे म्हणत सुनबाई कशी मागे राहणार म्हणून किरण मिलिंद ढवळे (सुनबाई) यांनीही आपल्या काकेसासु विरुद्ध अपक्ष सरपंच पदासाठी निवडणुकीत उभ्या झाल्या. अचानक चुलत सुनेद्वारे आपला विरुद्ध सरपंच पदासाठी अर्ज भरल्याने सासुबाई कोमात सुन जोमात अशी स्थिती निर्माण झाली आहे. दोन्हींचा गावात दांगडा प्रस्त असल्याने गावकरी कोणाला मत द्यायचे म्हणून बुचकल्यात पडले असून ढवळे नातेवाईकही या निवडणुकीत मतदार असल्याने कोणाला मत द्यायचे या पेचात पडले आहे