पुणे
सासवड- बोपदेव घाट – कोंढवा मार्गावरिल रस्त्यावर ठिकठिकाणी खडडे पडले आहेत ,यामुळे ये – जा करणार्या हजारो वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे .सासवड वरुन बोपदेव घाटाकडे जाताना परिसरातील बोपगाव ते भिवरी दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यावर खडडे पडले आहेत. बोपदेव घाट मार्गावरिल हिवरे ,चांबळी ,बोपगाव , भिवरी गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
तसेच प्रवास करणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे .सासवड बोपदेव घाट मार्गावरिल रस्त्याचे काम झाल्याचे अजुन वर्षे ही पुर्ण झाले नाही , तोच खडडे पडले आहेत. कामाच्या दर्जाविषयी वाहनचालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे .काञज तसेच स्वारगेट पी.एम.पी एम.एल आगारातुन सासवड साठी पी.एम.पी बसेस सुरु आहेत.
ठिकठिकाणी असलेल्या खडड्यांमुळे दुचाकी ,खासगी बसेस ,दुधगाड्या व चारचाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या मार्गावर ठराविक दिवसानंतर रस्ता दुरुस्ती व देखभालीकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांमधुन होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग ठिकठिकाणी असलेले खडडे बुजवुन त्यावर डांबरिकरण केव्हा करणार ? की एखादा भीषण अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार असा सवाल नागरिकांमधुन विचारला जात आहे.