सासवड जवळील अपघातात एक ठार तर दोन जखमी

सासवड जवळील अपघातात एक ठार तर दोन जखमी

पुरंदर

पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार मौजे पवारवाडी गावचे हद्दीत बर्फ कारखान्याजवळ टाटा कंपणीचा 1109 ई. एक्स. टर्बो. टेंम्पो नंबर एम. एच.04 डी. के./ 0419 चे चालकाने भरधाव वेगात चालवुन रहद्दारीचे नियमाडे दुर्लक्ष करून अचानक ब्रेक मारल्याने अपघात झाला मला छातीस, दोन्ही हाताचे दंडावर उजवे हाताचे बोटाजवळ दोन्ही पायाचे गुडघ्याला मुक्का मार लागला. मावस भाऊ कुशाल सुदाम थोरात यास डोक्यास मार लगला.

विनोद राजेंद्र शेटे यास डावे बाजुस भवईवर व पोटास मार लागला. अपघातात कारचे नुकसान झाले आहे.मावस भाऊ कुशाल सुदाम थोरात वय 19 वर्शे,रा. वांळूज, ता. पुरंदर, जि. पुणे हा उपचार दरम्यान मयत झाला.

सदरचा अपघात हा टेंम्पो नंबर एम. एच.04 डी. के./ 0419 वरील चालकाचे चुकीमुळे झाला आहे.म्हणुन मी सदर टेंम्पोवरील अज्ञात चालक नाव पत्ता माहित नाही याचे विरुध्द फिर्याद दाखल केली आहे.

फिर्याद प्रतिक चव्हाण यांनी दिली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौ. माने करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *