पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणारे आंबळे गाव.या गावात गेल्या महिनाभरात कोरोणाचा उद्रेक होऊन आंबळे गाव हे कोरोणा हॉटस्पॉट बनले होते.परंतु तरुण,तडफदार,युवा उपसरपंच सचिन दरेकर यांच्या योग्य नियोजनामुळे गावातील कोरोना बाधितांची संख्या ही कमी होत चालली आहे.
गेल्या महिनाभरात आंबळे गावात ४१ जणांना कोरोणाची बाधा झाली होती परंतु त्यातील ३२ जण हे कोरोणावर मात करुन बरे होऊन घरी आलेले आहेत.तर आता फक्त ७जण हे उपचार घेत आहेत.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ४१ बाधितांमधुन २ व्यक्तिंचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
आरोग्य विभागाच्या माध्यमातुन व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यांने जास्तीत जास्त लसीकरण लवकरात लवकर करुन आंबळे गाव हे कोरोणामुक्त करणार असल्याचे आंबळे गावचे उपसरपंच सचिन दरेकर यांनी सांगीतले.