पुणे
पुणे महापालिका हद्दीत नवीन गावे समाविष्ट झाल्यापासून आजतागायत जुन्या हद्दीच्या तुलनेत नवीन हद्दीत समाविष्ट परिसराचा अतिशय अल्प प्रमाणात विकास झालेला आहे. त्यामुळे या गावाच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दयावा अशी आग्रही मागणी कॉग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.
पालिकेतील सत्ताधारी भाजप विकास निधी बहुतांशी जुन्या हद्दीत राजकिय गणितानुसार वापरत आहे. त्यामुळे संभाव्य गावांचा परिसर विकासापासून वंचित राहत आहे .
त्यामुळे समाविष्ट गावातील करआकारणी बाबत स्थानिक,खासदार,आमदार,लोकप्रतिनिधी,आयुक्त करसंकलन विभाग प्रमुख यांची स्थानिक ग्रामस्थ यांच्या समवेत बैठक आयोजित करावी अशी मागणीही जगताप यांनी केली.नवीन गावे समाविष्ट झाल्यापासून आजतागायत जुन्या हद्दीच्या तुलनेत नवीन हद्दीत समाविष्ट परिसराचा अतिशय अल्प प्रमाणात विकास झालेला आहे. विकासाचा मोठा अनुशेष नवीन हद्दीत निर्माण झालेला आहे. पुणे मनपा रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य इत्यादी मूलभूत सुविधा देखील समाविष्ट परिसरासाठी उपलब्ध करून देऊ शकली नाही. प्रचलित नियमावली नुसार पहिले सहा वर्षानी टप्प्याटप्याने कर आकारणी वाढविणे व नंतर प्रचलित दराने कर आकारणी करणे योग्य आहे.
परंतु दहा वर्ष हद्दीत येऊन झाल्यावर देखील किमान मूलभूत सुविधा पालिका देऊ शकत नाही. त्यामुळे पालिका दराने कर आकारणी करू नये.
जो पर्यंत जुन्या हद्दीच्या परिसराच्या तुलनेत नवीन हद्दीत मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध मनपा करुन देत नाही तोपर्यंत जुन्या ग्रामपंचायत दराने कर आकारणी करण्यात यावी असेही जगताप यांनी सांगितले.