दौंड
दौंड तालुक्यातील घिगेवस्ती(यवत) शाळेचे मुख्याध्यापक अशोक पवार यांना तेथील एका व्यक्तीने दारु पिऊन शाळेत जाऊन जबर मारहाण व शिविगाळ केली आहे.
त्या व्यक्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे,सरकारी कामात अडथळा आणणे व इतर संबंधित बाबींविषयी फौजदारी गुन्हा मी स्वतः अशोक पवार यांच्यासोबत जाऊन यवत पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला आहे.
अशोक पवार सर यांची मेडिकल करून घेतली आहे. झालेली घटना गंभीर असून सदर घटनेचा दौंड तालुका शिक्षक समिती तीव्र निषेध करत आहे.
गुन्हेगार तरुणास शिक्षा झालीच पाहिजे अशी शिक्षक समितीची आग्रही मागणी आहे.पवार सरांच्या पाठीशी शिक्षक समिती खंबीरपणे उभी आहे.
सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की अशा काही घटना घडत असतील,कोणी विनाकारण त्रास देत असतील तर त्वरित संपर्क दौंड तालुका प्राथमिक शिक्षक समितीशी साधावा, शिक्षक समिती त्याची दखल घेऊन योग्य ते सहकार्य व त्याबाबतची कार्यवाही लगेच करेन.
शिक्षक समिती कायम सर्व शिक्षकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असेल.असे शिक्षक समिती दौंड तालुका यांच्या वतीने शशिकिरण मांढरे यांनी सांगीतले.