पुणे
राज्य परिवहन महामंडळाने पुकारलेल्या संपामुळे आज दुपारनंतर खुप प्रवाशांना मनस्थाप सहन करावा लागला असल्याचा अनुभव प्रवाशांनी मांडला.
सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही. ते आर्यन खान,वानखेडे,कोथळा,केंद्र सरकार जबाबदार या नको त्या गोष्टींवर बाकाळ गप्पा मारतय… तुमचे आधारस्तंभ,दिलदार नेते,गरीबांचे कैवारी कुठेत..? कामगार नेते एसी गाडीत (काळी गाडी) फिरणार आणि जनता मात्र उनातानात…
दुस-या कुठल्या राज्यात किरकोळ काय गोष्ट घडली तरी स्वतःची छाती बडवुन आरडाओरडा करणारे मुग गिळुन गप्प बसलेत वाटतं असेच काही विचार सामान्य माणसाच्या मनात येत आहेत.
राज्य सरकारने व परिवहन मंत्री यांनी लवकर सिद्धी वरती येऊन एसटी कामगारांचा संप सामोपचाराने मिटवून त्यांना त्यांच्या हक्क द्यावेत, विठ्ठल पवार राजे प्रदेशाध्यक्ष शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांची सरकार कडे मागणी.
महाराष्ट्र सरकार व राज्यातील जनतेसाठी ही अत्यंत दुर्दैवी घटना असे म्हणता येईल आज पर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या पण आता एसटी कामगारांच्या जवळपास अठरा-एकोणीस आत्महत्या झाल्या ही गोष्ट सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री सहकार मंत्री किंवा गृहमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत राज्याचे मुख्य सचिव प्रधान सचिव व सचिव हे लोकांना हे सर्वसामान्यांच्या होताना दिसत नाही आहे का आज एवढ्या मोठ्या तक्रारी सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये कुठे धाडी पडत आहेत, कुठे येते कुठे लागलेली आहे कुठे काय काय चाललय कुठे आहे कुठे आणि तो काय त्याचं नाव नवाब मलिक त्यांच्या फालतु कामाकडे सरकार ला पूर्ण लक्ष द्यायला वेळ आहे.? पण यांना शेतकरी कष्टकरी कामगार प्रवाशांकडे, त्यांचे मुलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि यांना मात्र गावी जाऊन या लोकांना दिवाळी करता येते नैते लोक मौजा मजा करतायेत सरकारी लोकांना आज ना उद्या याची किंमत मोजावी लागेल. तत्पूर्वी सरकारला एक सूचना आहे आणि त्यातली त्यात परिवाहन मंत्र्यांना बाबांनो तुम्ही त्या एसटी, कंडक्टर ड्रायव्हर यांना पगार दिलाच पाहिजे ते अत्यंत जोखमीचे काम करत आहेत त्यांचा पगार किमान ४९ हजारचे वरचा किंवा ५९ हजारचे खालचा असला पाहिजे म्हणजे अंदाजे चाळीस ते पन्नास हजार रुपये त्यांना पगार दिलाच पाहिजे, तुम्ही एकदा चा पगार देऊन टाका त्यांना आणि त्यांची मागची थकीत देणी पण उद्या, कुठे जाणार कुठले त्यांना दुसरा कोणता आधार आहे. दोन नंबरचे धंदे वाले नाही ते, त्यांना एक रुपयाचा कमी पडला तर पदरचा भरावा लागतो.
आणि ते सरकार मधले मलिदा गोळा करणारे म्हसुल वाले यांना जरा लाज वाटली पाहिजे ना, एसटी बस वाले 50/ 100 लोकांचा जीव घेऊन जातायेत त्याना सन्मानाने त्यांना पोचवतात घरापर्यंत. प्रवाशांच्या जीवाची काळजी घेतात सरकारने एसटी ड्रायव्हर कंडक्टर ची काळजी घेतली चे पाहिजे आणि ती घ्यायलाच पाहिजे, अता या परिस्थितीमध्ये हा संप मोडून काढायचा नाही किंवा मोडायचा प्रयत्न करू नये तर हा संप त्यांच्या मागण्या रास्त आहेत त्यांचे थकीत पगार द्या थकीत वेतन द्या त्यांच्या पगारामध्ये वाढ करा दिवाळीचा बोनस पण द्या त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका.
राजकारणी संप करायला लावतात आणि खाजगी वाहनांचे खाजगी बस चालक खाजगी गाड्या वाल्यांच्या तुंबड्या भरायच्या तिकडं पोलिसांमार्फत सरकारच्या दलालांना पैसे भेटतात हे बंद करा जनता जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत उगाच सरकारने ऊलटे सुलटे वागू नये. तुम्हाला 2014 ला धडा मिळालेला आहे आणि तसाच धडा घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचं ठरवा आमचं हे सांगण्याचे कर्तव्य आम्ही सांगितलेला आहे.
शरद जोशी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, शेतकरी कष्टकरी कामगार सहकार बचाव आंदोलन, सफाई कामगार युनियन या सर्वांच्या वतीने मी विठ्ठल पवार राजे सरकारला विनंती करतो की एसटी कामगारांना त्यांच्या मागण्या मान्य करा त्यांच्या आत्महत्या होऊ देऊ नका आत्महत्या हा देशाचे भूषण नाही राज्याचा भूषण नाही. आणि सरकारचं तर अजिबात नसावा मी हा संप तत्काळ सुटावा, त्यांचे प्रश्न सोडवून पूर्ववत सुरू प्रवाशी वाहतूक करायला सांगा आणि खाजगी गाड्या आणि वाहतूक दलाली बंद करा तर सरकारलाही त्याच्यामध्ये मोठा फायदा होईल एसटी महामंडळ पुन्हा पूर्ववत फायद्यात येईल.
जय किसान.
धन्यवाद .
विठ्ठल पवार राजे .
प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक .
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य