पुरंदर
संजीवनी न्युजने सकाळीच केलेल्या बातमीचा चांगलाच परिणाम झालेला दिसत आहे.
“पुरंदर मधील “या” गावात वाहते रस्त्यावरुन पाणी !!!!! चारच दिवसात पाणीपुरवठा करणार्या टाकीतुन दोनदा पाणी रस्त्यावर”या मथळ्याखाली लावलेल्या बातमीवर ग्रामपंचायत खडबडुन जागी झाली व त्यांनी या पाण्याचे नियोजन करण्यासाठी रस्ता उकरुन पाईप टाकुन रस्ता वाहतुकीस सुरळीत केला आहे.
वारंवारच पाण्याची टाकी भरते व ती ओव्हरफ्लो होऊन त्यातुन पाणी रस्त्यावर साचत होते पण आता पाईप टाकल्याने ते पाणी रस्त्यावर साचणार नाही असे सध्यातरी चित्र दिसत आहे.
परंतु जरी पाईप टाकुन पाणी काढुन देण्याचे काम केले असेल तरीही पिण्याच्या पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.