सातारा
शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरी बाकी होती. सदर प्रकरण मंजुरी करता पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील तालुका कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.
फलटण तालुक्यातील ४६ वर्षीय तक्रारदार व्यक्तीने त्यांच्या मयत पत्नीचे शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण मंजुरीसाठी तालुका कृषी विभागाकडे दिले होते. परंतु, सदरचे प्रकरण अनेक दिवसांपासून पडून होते. यावर निर्णय होत नसल्याने तक्रारदार व्यक्ती याकरीता कार्यालयात चकरा मारत होता.
शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरी करता पाठविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटणमधील कृषी पर्यवेक्षक बाळू निवृत्ती गावडे (वय ५२ राहणार प्लॉट नं ३ अष्टविनायक रो हाऊस सोसायटी प्रगतीनगर, बारामती) याने १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ती लाच रक्कम स्वीकारताना बाळू याला लाच लुचपत विभागाने सापळा रचून अटक केली आहे.