पुणे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदला घेण्याच्या त्या विधानावर रोहित पवार यांनी लक्ष वेधल. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकार लोक हितासाठी नाही, तर बदला घेण्यासाठी आल्याचा घणाघाती आरोप रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना केला.
तसेच येत्या 2024 ला महाराष्ट्रात बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत रोहित पवारांनी दिले .रोहित पवार खेड तालुक्यातील जलजीवन मिशन पाणी योजनेच्या कार्यक्रमात चाकण येथे बोलत होते. त्यावेळी रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. आपलं कुटुंब आणि महाराष्ट्रावर कोण बोलत असेल तर आपण शांत का बसायचे असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी हल्लाबोल केला.
‘छत्रपती शिवाजी महाराज,महापुरुष,संतांवर आक्षेपार्ह विधान केल्याची आठवण करुन देत भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली. तसा सत्ता स्वत:च्या हितासाठी आणि 40 आमदारांना खूश करण्यासाठी हवी होती, असा घणाघात आरोपही रोहित पवारांनी केला.चिंचवड पोटनिवडणुकीवर रोहित पवार यांनी भाष्य केलं. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होत असताना जगतापांच्या विरोधात रोष नाही. मात्र भाजपाच्या विरोधात रोष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विजय सहज होईल, असा आशावाद व्यक्त करत अश्विनी जगताप यांच्याबाबत रोहित पवारांनी सहानुभूती व्यक्त केली.