पुरंदर
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चौथ्यांदा पुरंदर दौरा रद्द केल्यामुळे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची मात्र पुरती पंचाईत झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु अपरिहार्य कारणामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. तसेच पुढील तारीख 23 जुलैस नियोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार होती.
या पार्श्वभूमीवर जेजुरी शहरातील जेजुरी नगरीत कार्यक्रम आयोजनाची प्रशासनाने तयारी सुरू केली होती. शिवाय या कार्यक्रमात लाभार्थीना योजनांचे प्रमाणपत्र वितरणासह तेथे शासकीय विभागांचे माहितीपर विविध स्टॉल्स उभारण्यात येणार होते, मात्र अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणावर मंडप व इतर सुविधांची वारी करण्यात आली होती. कार्यक्रमावर दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यामुळे प्रशासनाचे दोन कोटी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.
मोठ्या प्रमाणावर झालेल्या खर्चास जबाबदार कोण तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चौथ्यांदा पुरंदर दौरा रद केल्यामुळे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची मात्र पुरती पंचाईत झाली आहे.