पुरंदर
किल्ले पुरंदर याठिकाणी काल छत्रपती संभाजी महाराजांचा ३४२ वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. कोविड-१९ च्या नियमावलीचे पालन करुन ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट या संस्थेच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शहीद जवान निवृत्ती जाधव यांच्या वीरपत्नी सुरेखा जाधव यांच्या हस्ते हा राज्याभिषेक करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, अजितसिंह सांवत, संतोषभाऊ हगवणे, सागरनाना जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये सागर ताकवले यांना उद्योजक, डॉ.रणजित गायकवाड यांना सामाजिक, हरिश्चंद्र देसाई यांना कृषी आणि जितेंद्र गवारे यांना क्रीडा क्षेत्रातील शंभुगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. राज तपसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला . तसेच ओंकार जाधव व अथर्व कळंत्रे या खेळाडूंना प्रोत्साहनपर व प्रशिक्षण साठी आर्थिक मदत देण्यात आली .
यावेळी गडावर छत्रपती संभाजी महाराजांचा पालखी सोहळा काढण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल काटे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदिप कणसे यांनी केले व आभार वैभव शिंदे यांनी मानले .