दौंड
व्याजाने घेतलेले पैसे परत देता येत नसतील तर शरीरसुख दे, असे म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणार्या खाजगी सावकार तसेच दोंड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेवकावर दौंड पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग व सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राजेश शामराव जाधव असे नगरसेवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती : शहरातील एका ४० वर्षीय महिलेने डिसेंबर २०१९ मध्ये राजेश जाधव या सावकाराकडुन दोन लाख रुपये दरमहा ८ टक्के व्याजाने घेतले होते.
सदर व्याजाचा हप्ता दरमहा १६ हजार रुपये ही महिला देत होती. मात्र डिसेंबर २०२० पासुन पिडीतेला पैसे देता न आल्याने या महिलेला रस्त्यावर बोलावुन तुला माझे पैसे देता येतील का? माझे पैसे दे नाहीतर मी पैसे कसे वसुल करतो हे पुर्ण दौंडला माहित आहे असे म्हणुन शरीरसुखाची मागणी केली.
या महिलेने दौंड पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने राजेश जाधव याच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी राजेश जाधव यानी दौंड नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद भुषविलेले असुन सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विद्यमान नगरसेवक आहे.