सासवड पोलीस स्टेशनची नेत्रदीपक कामगिरी, खून खटल्यातील आरोपीला नेपाळमध्ये केलेजेरबंद.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या टिमचे सर्वत्र कौतुक,
सासवड
दिनांक ९/७/२०२१ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सोनोरी रस्त्यावर बोरकर वस्ती लगत एका नाल्याच्याठिकाणी भगवान मारकड याच्या मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात घातक शस्त्राने वार करून त्यांची हत्याकरण्यात आली होती. मयत भगवान मारकड यांच्या पत्नी छाया भगवान मारकड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासवडपोलीस स्टेशन येथे दिनांक ९/७/२१ रोजी खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला होता.सदरगुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत होते. हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यानेघटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेटदेऊन पोलिसांना त्वरित गुन्हा उघड करण्याबाबत आदेश दिले होते.
भगवान मारकड हा सोनोरी रोडवरील एका रिमोल्डिंग टायर च्या दुकानात मजुरी ने काम करीत होता. त्याला दारू पिण्याचेव्यसन होते. तो नेहमी दारू पीत होता. दारू पिण्या मध्ये भांडणे होऊन त्याचा खून झाला असावा असा पोलिसांना संशयवाटत होता. ज्या ठिकाणी प्रेत सापडले होते तेथून जवळच असलेल्या सचिन बोरकर यांच्या घरामध्ये नेपाळी इसमसासवडमध्ये फर्निचर चे काम करीत होता, तो भाड्याने राहत होता. तो इसम गुन्हा झाल्यापासून गायब असल्याचेपोलिसांना समजले. तो धागा पकडून त्याचे व भगवान मारकड यांचे काही संबंध होते का याबाबत पोलिसांनी तपासकेला. यावेळी अशी माहिती मिळाली की हे दोघे जण दारू पीत होते. पार्टी करीत असायचे.
घटनेच्या आदल्या दिवशी मयत भगवान व संशयित फर्निचरचे काम करणारा नेपाळी इसम निरंजन सहानी याने सायंकाळी८ वाजण्याच्या सुमारास त्याच्या रूमवर दारू मटण पार्टी केली. पार्टी सुरू असताना दोघांमध्ये किरकोळ गोष्टीवरूनबोलाचाली वरून वाद निर्माण झाला. व निरंजन साहानी याने लाकडी दांडक्याने भगवान मारकड याच्या डोक्यात मारहाणकेली. भगवान मारकड यास गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. व रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा मृत्यू झाला. मृत्यू नंतर निरंजन याने त्याचे प्रेत ओडत कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी, नाल्यां मध्ये फेकून दिले. व रात्रीमोटरसायकलने नेपाळ कडे रवाना झाला.
सासवड पोलिसांनी संशयित आरोपीला माहिती मिळताच त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, व्हि टी भोर , निलेश जाधव असे पथक नेपाळ करता रवाना झाले. नेपाळ बॉर्डरवर पोहोचण्या पूर्वी आरोपी हा घरी नेपाळ येथे पोचलाहोता.
नेपाळमध्ये जाऊन आरोपीला अटक करून शकत नाही. त्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी खूप तांत्रिक अडचणीआल्या होत्या. स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नव्हते.
अशा वेळी मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर तुषार यांनी अतिशय मोलाचे तांत्रिक मदत केली. सहाय्यक पोलीसनिरीक्षक राहुल घुगे यांनी आपल्या कौशल्य व अनुभव पणाला लावून आरोपीला नेपाळ बॉर्डरवर अत्यंत चलाखीने ताब्यातघेतले. व सासवड स्टेशन येथे आणले. आरोपी निरंजन सहानी यास १३/७/२१ रोजी अटक केली. असून १९/७/२१पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीला विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत. अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा पोलिसांनी ५ दिवसातउघडकीस आणला गुन्ह्याचे तपासी काम व आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्परपोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, यांनी मार्गदर्शन केले.
सासवड पोलिस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे पोलीस निरीक्षक झिंजूर्के, पोलीस हवालदार एसएम चांदगुडे, पोलीस हवालदार एस. बी. भिसे, पोलीस नाईक एस. सी. नांगरे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव, पोलीसकॉन्स्टेबल व्हि. टी. भोर, यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अतिशय चांगले प्रयत्न केल्याबद्दल पोलीस अधीक्षकअभिनव देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सासवड पोलीस स्टेशन व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्याटिमने केलेल्या नेत्रदीपक कामगिरी मुळे ,पुरंदर तालुक्यात सर्वत्र पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.