पुरंदर
रोगराई हटेल आणि पाऊसही चांगला पडेल कोरोनाकाळानंतर होत असलेल्या श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा च्या जत्रेत आज पारंपारिक भकानुक विधी संपन्न झाला यामध्ये यावर्षी चांगला पाऊस पडेल व रोगराई हटेल अशी भकाणुक करण्यात आल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केलाय.
पुरंदर तालुक्यातील वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा यांचा यात्रा उत्सव सुरू आहे दहा दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पारंपारिक भाकणुकीचा विधी संपन्न झाला या विधीसाठी हजारो भाविकांनी आज श्रीनाथ मंदिरामध्ये गर्दी केली होती आज पहाटे स. ४ वाजता देवाची पूजा करून मानकऱ्यामार्फत देवाला पोशाख करण्यात आला. दुपारी १:३०वा. सर्व काठ्या पालख्या देऊळवाड्यात आल्या.
आरती होऊन छबिण्याला सुरुवात झाली. एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर दुपारी २.२५ मिनिटांनी वार्षिक पीकपाणी, भविष्यवाणी (भाकणूक) सांगण्यात आली. त्यानुसार यावर्षी मृगाचे पाणी चार खंडात पडेल, जनतेचे समाधान होईल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल. हत्तीचे पाणी चार खंडात जनतेचे समाधान होईल. बाजरी पीक चांगले, उतरा,पूर्वा, तीन खंडात पडेल, चौथ्या खंडात साधारण राहील. गाई गुरे रोगराई हटली आहे. अशाप्रकारे भाकणूक झाल्यानंतर पालख्यासोबत दोन प्रदक्षिणा होऊन काठ्या-पालख्या आपापल्या पालखीतळावर मार्गस्थ झाल्या. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.